Events

Book Donation

Dr. Ravsaheb Nanaware Sir (Vice-Principal, Adv. M.N. Deshmukh Arts, Commerce and Science College, Rajur) Donated his Book to library

Date 10/03/2023

Book Donation

Dr. Ravsaheb Nanaware Sir (Vice-Principal, Adv. M.N. Deshmukh Arts, Commerce and Science College, Rajur) Donated his Book to library

Date 10/03/2023

महाराजा सयाजीराव गायकवाड दालन 

सौ.धारा भांड- मालुंजकर मॅडम  व लेखक बाबा भांड यांनी आपल्या अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले (अहमदनगर) ग्रंथालयास देणगी स्वरूपात दिलेली ' महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन ,औरंगाबाद यांचेमार्फत प्रकाशीत झालेली ' आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या महान कार्याचा आढावा घेणारी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील ग्रंथसूचीमधील सर्व ६५ संदर्भपुस्तके आज शुक्रवार दि. १०/०३/२०२३  रोजी ग्रंथालयाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून ते दालन वाचकांसाठी खुले करून देण्यात आले. 

डिस्प्लेवर लावलेल्या पुस्तकांसोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके,राजूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रावसाहेब ननावरे सर,संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री.संपतराव मालुंजकर, ग्रंथपाल व महाविद्यालयातील  स्टाफ उपस्थित होता. आपण दिलेल्या ग्रंथरूपी देणगीबद्दल आपले व माननीय बाबा भांड साहेबांचे खूप खूप आभार.

New Arrival

Mrs. Dhara-Bhand Malunjkar donated complete collection of books on Maharaja Sayajirao Gaikwad. Library Displayed these books on New Arrival Display and planing to start Special section.

New Arrival

Mrs. Dhara-Bhand Malunjkar donated complete collection of books on Maharaja Sayajirao Gaikwad. Library Displayed these books on New Arrival Display and planing to start Special section.


शांतता... पुणेकर वाचत आहेत ! (वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रम)

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्या मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यास (National Book Trust), उच्चशिक्षण मंत्रालय, भारत सरकार,नवी दिल्ली व फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे १६ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी सुरु होत असलेला भव्य ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२३’  या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सह संचालक (उच्च शिक्षण) पुणे विभाग,पुणे १ यांच्या पत्रान्वये आज दि. १४/१२/२०२३ रोजी दुपारी १२ ते १ यावेळेत आपल्या अगस्ति कला,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय,अकोले(अहमदनगर) येथील ग्रंथालयाच्या वतीने "शांतता,पुणेकर वाचत आहेत" हा उपक्रम मा.प्राचार्य डॉ.भास्कर शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाविद्यालयात राबविण्यात आहे.

   या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके सर यांचेसह अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या आवडीचे पुस्तक ग्रंथालयातून घेऊन वाचले व पुस्तक वाचतानाचे फोटो संबंधित लिंक वर अपलोड केले.

   सर्वांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देवून सहभाग नोंदविला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित आहे.

   सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल प्रा.प्रदीप बच्छाव, सहाय्यक ग्रंथपाल डॉ.प्रवीण घुले व ग्रंथालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.